१५ फेब्रुवारी १९५० रोजी पुणे नगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेत रुपांतर झाले. ही प्रक्रिया व्यवस्थित प्रकारे पार पाडण्यासाठी व पुणे शहराच्या आकांक्षा, होणारा विस्तार, आव्हाने, लक्षात घेऊन १९४७ पासून पुण्याचे जिल्हाधिकारी असणारे समर्थ व द्रष्टे प्रशासक श्री स. गो बर्षे पुणे म.न.पा. चे यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यांनी कायद्याच्या चौकटीत सर्वाकश योजनाबध्द विकासाचा मार्ग अवलंबला.
श्री स.गो. बर्वे यांची पार्श्वभूमी पुण्याचीच. त्यांचे शालेय शिक्षण १९२४ पासून पुण्याच्या डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल नानावाडा येथे व महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्यूसन महाविद्यालयात झाले. शाळेत व महाविद्यालयात वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत त्यांनी यश मिळवले. १९३४ साली बी.ए. च्या परीक्षेत अनेक शिष्यवृत्या आणि अर्थशास्त्रातले कॉल्डेन क्लब मेडल, इतिहास व अर्थशास्त्र सयुंक्त विषयात सर्वात जास्त गुण मिळवत जेम्स टेलर पारितोषक व इंग्रजीचे एलिस् प्राईजही मिळवले.
हा काळ होता ब्रिटिश अमदानीचा व स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलने व चळवळीतल्या युवकांच्या सहभागाने व्यापालेला. सदाशिव हा मुळातच बुद्धीवान व स्वतंत्र विचारांचा व विविध विषयांचे वाचनाचा व्यासंग असलेला व स्वतःचे विचार तावून सुलाखून पके करणारा. श्री. गोपाळ कृष्ण गोखले, प्रा. वि.गो
Birth – college:
द्रष्टे प्रशासक सदाशिव गोविंद तथा स.गो. बर्वे
पुणे महानगरपालिकेची स्थापन १५ फेब्रुवारी १९४९ मध्ये झाली. ब्रिटिश काळात पुणे शहर हे मुंबई इलाख्याची हंगामी राजधानी मानली जात असे, त्यामुळे queen of deccan पुण्याला मान. पुण्यात सदर्न कमांडचे मुख्य कार्यालय, संरक्षण खात्याच्या दारूगोळ्याची ‘अॅम्युनेशन फॅक्टरी’, ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’ इत्यादी केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील महत्त्वाची कार्यालये होती. ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ पुण्यात स्थापन झाली. ‘पुणे विद्यापीठा’ची स्थापना नुकतीच झाली होती. शैक्षणिक क्षेत्रात तर पुणे आधीपासूनच आघाडीवर होते. त्या वेळी महानगरपालिकेच्या क्षेत्रात पुण्याच्या आसपासची गावं सामील करण्यात आली. आता पुण्याची लोकसंख्याही वाढू लागली. अशा या महत्त्वपूर्ण शहराच्या महानगरपालिकेचा कारभार सांभाळायला तितकीच कार्यक्षम आणि पडाडीची व्यक्ती नियुक्त करायला हवी हे जाणून पुणे महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून श्री. सदाशिव गोविंद बर्वे, आय.सी.एस. यांची नियुक्ती करण्यात आली. ही निवड किती योग्य होती याची वारंवार प्रचिती सर्वांनाच आली.
पुणे हे कार्यक्षेत्र असलेल्या बर्वेचा जन्म मात्र सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं झाला. २७ एप्रिल १९१४ ही त्यांची जन्मतारीख. त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्यांचं दहाबारा माणसांचं एकत्र कुटुंब होतं. मूळचे कोकणातल्या नेवरे गावचे, बाड आडनाव असलेले हे कौशिक गोत्रोत्पन्न चित्पावन कुटुंब पेशवाईच्या उत्तरार्धात देशावर आलं आणि पेशव्यांनी त्यांना बर्वे नामाभिधान दिलं. पेशव्यांशी या घराण्याचे वैवाहिक नातेसंबंध जुळले आणि तेव्हापासून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत या कुळात जन्मास आले. आपले चरित्रनायक सदाशिवराव हे अशा कर्तबगार घराण्याचे तितकेच कर्तृत्ववान वारस !
देशाच्या दक्षिण विजयाचे सूत्रधार असलेले सरदार परशुराम पटवर्धन मुख्य गादीचे संस्थानिक, सदाशिवरावांचे आजोबा श्री. रघुनाथराव को सुमार, सुशिक्षित होते. त्यांचे सुपुत्र दिवाणबहादुर अण्णासाहेब तथा श्री. गोविंदराव है या काळी बी.ए. पदवी संपादन करून ब्रिटिश सरकारच्या नोकरीत रुजू झाले सदाशिकावाच्या जन्माच्या वेळेला ते महालकरी होते. ते स्वकर्तृत्वाने असिस्टंट कलेक्टा सदाशिव उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले. गोविंदरावांचे इंग्रजीवर प्रभुत्त्व होते. ते इग्लंडला जाऊन आले होते. अतिशय निःस्पृह, शिस्तप्रिय, सत्यप्रिय आणि करारी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. कामात अतिशय चोख असल्याने वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी असे. आपल्या या सर्व गुणांचा वारसा त्यांनी सदाशिवरावांना दिला.
सदाशिवरावांची आई या पूर्वाश्रमीच्या इंदिराबाई ही तासगावच्याच सधन आणि सुविद्य गोखले घराण्यातील होती. त्यांच्या वडिलांचा आरतीसंग्रह त्या काळी प्रसिद्ध होता. सदाशिवरावाना आईकडूनच काव्य आणि साहित्याचा वारसा मिळाला होता. सदाशिवरावांना घरी ‘बापू’ असे हाक मारीत. गोविंदरावांना बढती मिळाली आणि त्यांची विविध ठिकाणी बदली झाली. त्या निमित्ताने शिराळा, चाळीसगाव, जळगाव अशा अनेक ठिकाणी लहानग्या बापूची भ्रमंती झाली. त्यामुळे बापूचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं. जळगावला अण्णासाहेब हे कलेक्टरांचे चिटणीस म्हणून आले. गावाबाहेरील सरकारी बंगल्यात राहण्यासाठी गेले. तिथे राजबाडे नाना, देशपांडे, केळकरांचा मनोहर असे मित्र मंडळ जमले. सर्वांचे अभ्यासात त्यांच्या त्यांच्या वर्गात अग्रस्थान असे. सामाजिक दर्जापण सारखाच. हुशार समवयस्क मंडळींचा सहवास आणि आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने बालपण आनंदात गेलं.
पुढे गोविंदराव पुण्यास येऊन स्थिरावले आणि तिथेच बापूच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. गोविंदराव पुण्यात गावाबाहेरील सरकारी बंगल्यात न रहाता मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून नारायण पेठेत पत्र्या मारुती जवळ रहावयास आले. त्या वेळच्या रिवाजानुसार त्यांच्याकडे त्यांचे पुतणे, भाच्चेही शिक्षणासाठी आलेले होते. बापूची थोरली बहीण येसुताई ऊर्फ अका, धाकट्या तारा नि कमल या दोघी बहिणी आणि बापू. बापू सर्वांचा लाडका होता. तो अतिशय खोडकर आणि खेळकर होता. या वाड्यात गोविंदरावांची ऑफिसची स्वतंत्र खोली होती. बापूंची आई अन्नपूर्णाबाई म्हणजे साक्षात् गृहलक्ष्मी। या सर्व भाच्या, पुतण्यांचे हवे नको अगदी आपलेपणाने, आप पर भाव न धरता `करत असत. दहा माणसांच्या रगाडधात जो मुलगा देगा किंवा खोड्या करेल त्याचे पान अण्णांच्या जवळ अशी शिक्षा असे. मुलांना ही शिक्षा खूप होई. अण्णासाहेब विचारीत ‘अरे था आठवडधात जास्त वेळा तुझे पान माझ्याजवळ आले.’
Changes in life (Death of father and Marriage)
१९३८ साली त्यांच्या जीवनात अनेक बदल घडले. ते सुरतला असताना त्यांचे बडील सांगली संस्थानचे दिवाण होते. एकदा कर्नाटकातील शिरहट्टी गावी हिंदू मुसलमान दंगल उसळली. अंगात ताप असतानाही दिवासाहेब तिथे गेले आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. सदाशिवराव सुरतेहून पित्याच्या भेटीसाठी आले; पण त्यांनी पितृछत्र गमावले.
स.गो. बर्वे यांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी कु. शरयू तुझे हिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्याची झळ त्यांच्या मनोनिग्रहावर किंवा अभ्यासात पडू न देता ते केब्रिजला जाऊन आय.सी.एस. होऊन आले. पूर्वी दिलेल्या वाचानला जागून त्यांनी शरबूशी तय करण्याचा निर्णय घेतला. २७ जून १९३८ रोजी मुंबईला प्रेटरोड इथं सदाशिवराव बवे आणि शरयू गुप्ते यांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला आणि सहजीवनाला सुरुवात झाली. धारवाड इथे मित्रमंडळींना बोलावून गायन वादन असे कार्यक्रम चालत. सुखी वैवाहिक काळ त्यांनी अनुभवला.
Entry in politics
सक्रिय राजकारणात प्रवेश सनदी अधिकारी असला तरी त्याच्या अधिकारावर मर्यादा असतात, याची जाणीव त्यांना होऊ लागली आणि लोककल्याणासाठी हातात सत्ता असायला हवी, असं वाटू लागलं. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. १९६१ मध्येच पुण्यातून काँग्रेसपक्षातर्फे निवडणूक लढवून ते विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली. पुढे वसंतराव नाईकांच्या काळात त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या कामाची दखल घेत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमलं. ठाणे, बेलापूर, खोपोली, पनवेल, औरंगाबाद, चिपळूण इथल्या औद्योगिक वसाहती आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभ्या आहेत.
१९६५ मध्ये केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. दिल्लीला आपले लोक आपल्या मागण्या मांडण्यासाठी एकत्र येत नाहीत आणि उत्तम नियोजन करूनही अंमलबजावणी नीट होत नाही, याची खंत त्यांनी परखडपणे मांडली. ते सनदी अधिकारी होते, राजकारणी नव्हते. त्यांना समाजाच्या भल्यासाठी काम करायचे होते. त्यांना सत्ता, खुर्ची आणि मानपान यात रस नव्हता आणि तो त्यांचा पिंडही नव्हता. त्यांच्या बाबतीत त्यांचे कार्यच सर्व काही होते. निवडणुकीत त्यांची ओघवत्या शैलीतील भाषणे आणि कळकळीचे सांगणे लोकांना भिडत असे आणि म्हणूनच १९६७ साली प्रस्थापित कृष्ण मेनेन यांच्या समोर निवडणुकीत ते विजयी झाले. दिल्लीला ते मंत्रिमंडळात अर्थ किंवा
उद्योगमंत्री नक्कीच झाले असते; पण दुर्दैवाने त्या आधीच ६ मार्च १९६७ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. घेतल्याच्या काळात कुटुंबाकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक होतं. त्यामुळे विवाहानंतर बारा वर्षांनी त्यांची पत्नी शरयू गुप्ते-बर्वे त्यांच्यापासून विभक्त झाल्या. बर्वेसाहेबांचं आपल्या आईवर प्रेम होतं. ते वेळातवेळ काढून थोड्या काळासाठी हा होईना; पण आईला भेटायला येत असत. बहिणी भावंडांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाहेरचा मोठेपणा या नात्यात
Personal familial news
कौटुंबिक बर्वे : या सगळ्या धामधुमीच्या आणि कारकिर्दीला संपूर्णपणे वाहून त्यांनी कधीही येऊ दिला नाही. त्यांची भावंडेही सुविद्य होती. आपल्या या निःस्पृह, निग्रही, शिस्तप्रिय आणि तरीही प्रेमळ भावाचा सर्वांना अतिशय अभिमान वाटत असे.
बर्वेसाहेब सौंदर्याचे भोक्ते होते. राहणी साधी; पण त्यांची निवड मात्र चोखंदळ होती. नीटनेटके राहणे त्यांना आवडत असे. आपल्या भावंडांचे गुण पारखून त्यांच्याकडून योग्य ते काम ते करून घेत. प्रोत्साहन देत. काव्य साहित्य याची बर्वेसाहेबांना अतिशय आवड होती आणि अशा लोकांबरोबर त्यावर चर्चा करण्यात ते रमून जात. कविवर्य ग.दि. माडगूळकर यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. सांगलीच्या पद्मिनीराजे यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्या मुलांना त्यांनी पितृवत प्रेम आणि संस्कार दिले.
आपल्या कर्तृत्वाने आपल्या घराण्याचे, गावाचे, राज्याचेच नव्हे; तर देशाचेही नाव
उंचावणारे बुद्धिमान प्रतिनिधी, कुशाग्र बुद्धीच्या जोडीला विलक्षण परीश्रमांची जोड मिळाल्याने प्रत्येक क्षेत्रात तेजाने तळपणारे उत्तम प्रशासक, संवेदनशील समाजसेवक आणि प्रेमळ कुटुंब प्रमुख असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या स.गो. बर्वे यांना शतशः प्रणाम ! त्यांच्या कार्याची व्याप्ती बघता हे अल्पचरित्र पुरेसं नाही याची विनम्र जाणीव आहे
पणत्यांच्या कार्याची थोडक्यात का होईना माहिती व्हावी आणि पुढील पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतूने ही पुस्तिका तयार केली आहे.
‘बर्वे चरिटेबल ट्रस्ट’ द्रष्टे प्रशासक हे स.गो. बर्वे यांच्या कार्याचा विस्तृत वृत्तान्त देणारं पुस्तक लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
त्याच्या प्रशासकीय कार्याचा यथोचित आढावा घेणारं आणि सध्याच्या प्रशासकांना केवल प्रेरणाच नव्हे तर कार्यप्रवृत्त करणारं स्वतंत्र पुस्तक संपादित करण्याचे काम सुरू आहे. बाबक त्या पुस्तकाचेही स्वागत करतील, असा विश्वास ‘बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्तांना आहे.
१९५३-५४ साली ते भाषामंडळाचे चिटणीस म्हणून काम केले. तसेच १९५६ साली महाराष्ट्राच्या एस.टी. महामंडळाचे उपाध्याक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर, व नंतर १९५७ साली पाटबंधारे विभागाचे सचिव म्हणून काम करताना कोयना योजना आखली व त्यासाठी जागतिक बँकेचे कर्ज मंजुरी साठी गेलेल्या शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. १९६० साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या सिंचन आयोगाचे ते प्रमुख होते.
त्यांच्या
