Work in other cities:

Work begins in ahmedhabadh

कार्यकुशलतेची चुणूक सदाशिवरावांची २३ नोव्हेंबर १९३६ रोजी अहमदाबादमध्ने उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक झाली. अहमदाबाद इथे झालेल्या धार्मिक दंगलीत त्यांनी कठोर निर्णय धाडसाने घेतले आणि दंगल आटोक्यात आणली. पुढे वर्षभराने ताप्ती

नदीकरील एका दुर्घटनेच्या चौकशी समितीबर काम करण्यासाठी सुरतचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. तिथे त्यांनी प्राध्मारक पाळदे आणि महविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने आसपासच्या ग्रामीण भागातील रस्ते श्रमदानाने सुधारले, सुरदच्या कारकिर्दीत त्यांनी भारत जवळून अनुभवला. दैन्य, दुःख, अज्ञान यांनी ग्रासलेल्या लोकांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिलं. जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढला आदिवासींचा भाग पालथा घातला. आदिवासी त्यांना भेटत आणि बर्वे त्यांचा न्यायनिवाडा जागेवरच करत. भेटीला आलेल्या खेडुतांशी ते त्यांच्या गुजराथी भाषेत बोलत आणि त्यामुळे त्यांना जवळचे बाटत. हाताखालच्या अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर अवलंबून न रहाता स्वतः पाहणी करत. शेतकऱ्याशी संवाद साधत काळीज या मागासलेल्या जमातीचा ज्वलंत प्रश्त्र त्यांनी तत्परतेने सोडवला.

Work in Delhi, work for Language comission, work for koyna dam, funding, work for st transport

दिल्लीतील कारकीर्द : जून १९५२ मध्ये बर्वेसाहेबांची नेमणूक दिल्लीला पुनर्वसन मंत्रालयात झाली. खरंतर पुण्याबाबत त्यांनी योजलेली अनेक कामे बाकी होती; पण सनदी अधिकारी असल्याने त्यांना सरकारी हुकूम मोडणे शक्य नव्हते. ते जरा नाखुशीनेच दिल्लीला गेले. पं. नेहरू आणि चिंतामणराव देशमुख यांनी त्यांच्यावर फरीदाबाद उभारणीची जबाबदारी दिली. फरीदाबादची स्थिती अतिशय वाईट होती. कार्यालयातला टेलीफोनसुद्धा नादुरुस्त होता. पण शून्यातून काम सुरू करून बर्वेसाहेबांनी एका वर्षात फरीदाबाद शहराचा कायापालट केला.

अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी सदाशिवरावांना आपल्या खात्यात सहसचिव म्हणून रुजू करून घेतले. तिथेही अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या. या पदावर असताना इम्पिरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर आणि अनेक इन्शुरन्स कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून ‘लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन मध्ये विलीनीकरण ही कामे त्यांनी केली.

‘केंद्र सरकारच्या आंतरराज्य विक्रीकर कायद्याच्या अत्यंत किचकट प्रश्नांची उकल करताना श्री. सदाशिवराव बर्वे यांनी जे कौशल्य दाखवले ते त्यांच्या केंद्रीय अर्थखात्यातील यशस्वी कामाचे जणू शिखर होते,’ अशा शब्दात खुद्द चिंतामणराव देशमुख यांनी बर्वेसाहेबांचे कौतुक केले.

भाषा मंडळाचे काम नव्याने स्वातंत्र्य मिळालेले असल्याने त्या काळी भाषाबार प्रांतरचना आणि भाषा प्रश्नांची संवेदनशील बाबा हाताळण्यासाठी भाषा मंडळाची स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष होते पहिल्या लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. स. गो. बर्वेना खेरसाहेबांनी आग्रहाने सचिव म्हणून भाषा मंडळात बोलावून घेतले. बर्वेसाहेबांचे मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराथी, कानडी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. भाषामंडळाच्या देशभरातील दौऱ्याचे नियोजन अतिशय कल्पकतेने काढून त्यांनी तो यशस्वीपणे पूर्ण केला. बर्वे यांची सर्वगामी कुशाग्र बुद्धी, अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांचा आशय चटकन ओळखण्याची शक्ती आणि सदैव सौजन्यशील आणि सभ्य वागणूक यांचा मंडळाच्या सदस्यांवर कायमचा ठसा उमटलं आहे. चौकशीच्या शेवटी साक्षीपुराव्यांची छाननी करून आमचे निष्कर्ष आणि शिफारशी योग्य प्रकारे मांडण्यास त्यांची फार मदत झाली. मतभिन्नतेच्या वेळी एकवाक्यता कोठवर येऊ शकते हे ते शोधत असत. ‘बर्वे यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेची जोड भाषा मंडळाला मिळाली नसती तर हे काम ठरावीक वेळेत योग्य पद्धतीने पूर्ण झाले नसते,’ असं बाळासाहेब खेर यांनी मंडळाच्या अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

कोयना प्रकल्प निधीअभावी रखडला होता. तेव्हा कोयना प्रकल्पाचा बर्वेसाहेबांनी साद्यंत अभ्यास केला. अमेरिकेत जाऊन योजनेचे स्वरूप तेथील तज्ज्ञांना पटवून दिले आणि जागतिक बँकेकडून दोन कोटी पन्नास लाख डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यांचा अभ्यास आणि आराखडा इतका शास्त्रशुद्ध असे की इंजिनियर्सही चकित होत असत. स्वतःचा विषय नसूनही ते इतके कसे बोलू शकतात, असा प्रश्न लोकांना पडे आणि यावर ‘मनुष्याला बुद्धी असली आणि तिच्यावर विशिष्ट तन्हेने विचार करण्याचे संस्कार झाले तर यात अवघड काहीच नाही,’ असे विनम्र उद्‌गार ते काढत.

राज्य सरकारच्या एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून १९५६ साली ते रुजू झाले. दापोडी, सातारा, भोर इथे त्यांनी स्थानकांसाठी जागा घेतल्या. मुंबई सेन्ट्रल इथे उभी असलेली एस.टी. महांदालाची वास्तू त्यांच्या कारकीर्दीत झाली.

Work in mumbai

१९५७ च्या मे महिन्यात त्यांची नियुक्ती मुंबईला पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटला झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते पहिल्या सिंचन आयोगाचे अध्यक्ष झाले. सिंचनावरच शेती आणि उद्योगधंदे अवलंबून आहेत हे जाणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा काढून संशोधन केले. त्या वेळच्या प्रमाणांच्या सहापट जमीन सिंचनाखाली आणण्याची शिफारस आपल्या अहवालात केली.

ग्रेटर बॉम्बे कमिशनवर असताना १९५९ साली त्यांनी मुंबई विकासाच्या अनेक योजना आखल्या. वांद्रे कुर्ला खाडीत भर घालून तिथे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्या वसाहती निर्माण कराव्या, अशा सूचना अहवालात केल्या. १९६० साली औद्योगिक विकास मंडळात काम करत असताना अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून त्यांनी राज्यातील उद्योगविषयक संस्थांची उभारणी करायला सहकार्य केलं. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरू झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. शासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कडक शब्दात अहवाल सदर करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. सत्ताधारी काँग्रेस पक्षावर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी हा. अहवाल गांभीर्याने घेण्याची सूचना सरकारला केली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. विभाजन समितीबर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून बर्वेसाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी केली.

श्री. स. गो. बर्वे १९३६ साली अहमदाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून वयाच्या २२-२३ व्या वर्षी रुजू झाले. पुढील १० वर्षाच्या काळात सुरत येथे व मुबंई राज्याचे गृहखात्याचे डेप्युटी सेक्रेटरी, नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध विभागाचे अतिरिक्त संचालक, धारवाड व अहमदाबाद येथे जिल्हाधिकारी अशा विविध खात्यात कामकाज केले. ग्रामीण भारतातल्या गरीब लोकांच्या समस्या समजून घेतल्या. १० वर्षाचा कालखंड (Grass root level) हया अभ्यासात घालवल्यानंतरच मनाजोगी देशसेवा करता येईल असे

त्यांनी अगोदरच ठरवले होते.

महानगरपालिकच्या मालकाच्या झाल्या असत्या.

श्री. स. गो. बर्वे आपल्या विविध क्षेत्रातल्या अनुभवावर आधारित व्यासंग व लेखन चालू ठेवत त्यांनी “Urbanization in Maharashtra State: Problems and Plan of Action” व “India’s Urban Future” या निबंधाची निवड व समावेश (Selected Studies from International Conference) Edited by Roy Turner, Berkeley and Los Angeles University) मध्ये झाली व California Press ने प्रकाशित केले.

१२

श्री. स.गो. बर्वे यांची सेवानिष्ठ देशप्रेम व लोकांसाठी झटून काम करण्याचा वेग पाहता अशी खंत वाटते त्यांनी तयार केलेला पुण्याचा मास्टर प्लॅन प्रत्यक्षात येऊ शकला नाही व त्यामुळे पुण्याचे फार मोठे नुकसान झाले.

१९५२ ते १९५३ साली त्यांनी दिल्ली येथे भारताच्या अर्थमंत्रालयात अर्थमंत्री श्री. चिंतामणराव देशमूख यांच्या हाताखाली सचिव म्हणून काम केले, त्यात इंपिरियल बँकेचे स्टेट बँकेत रूपांतर तसेच विविध विमा कंपन्याचे एलआयसी मध्ये विलीनीकरण हे काम प्रमुख होते.

नंतर १९६३ साली ते उद्योगमंत्री झाले, मुंबईतील उद्योग मुंबई बाहेर – ग्रामीण भागात जावेत या साठी M.I.D.C., M.S.S.I.D.C. तसेच SICOM यांची स्थापना करून १९६१- ६२ साली पुण्याच्या भोसरी पिंपरी, चिंचवड येथे एमआयडी सी ने १० हजार एकर जमिन घेतली व उदयोग क्षेत्रात मोलाचे विस्तारीकरण केले. तसेच ठाणे, बेलापूर उद्योग वसाहती तयार केल्या, एमआयडीसी ने कोकणात चिपळूण, औरंगाबाद, खोपोली येथे कार्यविस्तार केला. यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर झाला. १९६४ साली लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्रीय पातळीवर उद्योग खात्यासाठी नियोजन मंडळावर पूर्ण वेळ सदस्य म्हणून काम करण्यासाठी श्री. बर्वे यांना बोलाविले.

१९६७ साली इशान्य मुंबई, मतदार संघातून श्री. व्ही. के. कृष्ण मेनन यांच्या विरूध्द ते निवडून आले, पण अशा कर्तबार सहृदयी, देशप्रेमी प्रशासकास व लोकसेवकास फक्त ५३ वर्षाचे आयुष्य लाभावे हे पुणेकरांचे महाराष्ट्राचे व भारताचे दुर्दैव ६ मार्च १९६७ साली दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. I

श्री. मोहन कलकर्णी