Work in Pune

Pune / solapur ICS Work

प्रशासन शिस्तबद्ध कार्य : १९३९ साली पुण्याचे असिस्टंट कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट म्हणून बव्यांची नेमणूक झाली. पण दोनच महिन्यात सोलापूरला बदली झाली. पुढे लगेचच ते मुंबईला गृहखात्याचे अंडर सेक्रेटरी म्हणून गेले. वर्षभरातच बढती मिळून डेप्युटी सेक्रेटरी झाले. नागरी पुरवठा तसंच अन्न आणि औषध विभागाचे अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी १९४३ सालपर्यंत कान बघितलं. त्यानंतर नोव्हेंबर १९४३ ते मे १९४७ या काळात त्यांनी अहमदाबाद, धारवाड, पुणे इथे कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट या पदावर काम केलं. धारवाड येथे कानडी भाषेचे धडे घेऊन त्यावर त्यांनी ती लवकरच अवगत केली. ने लिये किये कामासाठी गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या कामाची विशिष्ट पद्धत सुरू करून दिली

Work in pune

प्रशासकीय कामाला शिस्त लावली. ते स्वतः अतिशय काटेकोरपणे आणि झोकून देऊन काम करत असत आणि आसपासच्या लोकांनी पण त्याच पद्धतीने काम करावं ही अपेक्षा करीत असत. आपल्या वडिलांचा कर्तबगार आणि करारी अधिकारी असलेला बाणा यादी पुढे आपल्या कारकिर्दीत तंतोतंत पाळला. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या पुढे किती आरि कोणत्या समस्या आहेत, किती प्रत्रांना आपल्याला तोंड द्यायचं आहे, याची पक्की जाणीव त्यांना होती. जिल्हाधिकारी हा राज्यशासनाचा त्या जिल्ह्याचा प्रतिनिधी मानला जातो. स्वातंत्र्याच्या आधी फक्त शांतता आणि सुव्यवस्था राखणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे काय असेल पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे लोकराज्य झाले आहे, लोककल्याणासाठी कारभार करायचा आहे याची जाणीव त्यांना होती. म्हणून ते म्हणत असत, राज्यकारभार हे नुसते शास्त्र नाही तर है एक कला आहे… प्रामुख्याने तो एक व्यवहार आहे. सुधारणा करताना ‘लोककल्याण है एकच गोह प्राधान्याने लक्षात ठेवली पाहिजे. इंग्रजी सत्तेत सनदी अधिकारी म्हणून काय केलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत चर्वेची लोकसेवक असलेली वृत्ती खरोखरच सुपीक अशी होती. हा वेगळा अधिकारी आहे, याची खात्री लोकांना पटली. आपले आचरण आपल्या बुद्धीच्या विचारांप्रमाणेच असावे हा प्रामाणिकपणा बर्वेच्या जवळ होता म्हणूनच के लोकशासकही होते आणि लोकसेवकही होते. त्यामुळेच ते जिथे जिथे गेले तिथे लोकाच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली. प्रशासनाला आधुनिकतेचा स्पर्श १८ मे १९४७ रोजी त्यांची पुण्याच्या कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट पदावर नियुक्ती झाली. नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार कसा कराया याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं. सनदी अधिकारी कार्यक्षम असेल तर हाताखालच्या मंडळींना काम करावंच लागतं. चांगल्या कामाची दाखल घेतली तर कामकार सुधारण्यासाठी ते उपयुक्त ठरते आणि कामात हेळसांड किंवा दुर्लक्ष झाल्यास क्षमा केली जाणार नाही, ही जरब असेल तर तसे धाडस कोणी करू शकत नाही, हे धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यामुळे ते कडक अधिकारी म्हणून ओळखले जात; पण स्वतः कामात अतिशय चोख असल्याने त्यांच्याविषयी आदर वाटे. जुन्या रेंगाळलेल्या कामांचा झपाट्याने निपटारा, दिलेली कामे विशिष्ट कालमयदित पूर्ण करण्यावर भर, जुन्या दप्तरांची विल्हेवाट आणि पूर्ण झालेल्या कामांची योग्य नोंदणी अशी आधुनिक आणि कार्यप्रवण पद्धती त्यांनी राबवली. आज ज्याला ‘झीरो पेंडन्सी’ म्हणतात ती बर्वेसाहेबांनी त्यांच्या काळात राबवली.

Work after Gandhi’s assasination

३० जानेवारी १९४८ हा दिवस सदाशिवराव बर्वेच्या कार्यक्षमतेची कसोटीपे ठरला. महात्मा गांधीजींची हत्या झाली होती. या कठीण काळात त्यांची ऑफिसर स्पेशल ड्युटी म्हणून नेमणूक झाली. देशभरात जनक्षोभ उसळला होता. एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण माणसाने गांधीजींना मारलं वा संतापाने अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली होती. गांधी हत्या केलेले नथुराम गोडसे पुण्याचे होते. त्यामुळे पुणे शहर अतिशय संवेदनशील स्थळ झालं होतं. या आणीबाणीच्या काळात बर्वेनी जोखीम असलेल्या कुटुंबीयांना तर सुरक्षित स्थळी हलवलंच; पण स्वतःच्या अधिकारात लष्कराला पाचारण केलं. बर्वेना आपण घेत असलेल्या निर्णयाची, त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण कल्पना होती. त्याची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी होती. ते अतिशय काटेकोरपणे आज्ञा देत होते आणि अधिकारी त्यांच्यावरच्या विश्वासाने त्या पाळत होते. संचारबंदी लागू झाली. पुणे शहराची नाकेबंदी झाली. सर्वांना आपापल्या परीने सुरक्षितता मिळाली. नंतरच्या शांततेच्या काळात ‘बर्षे होते म्हणून अनर्थ टळला’ असे उद्वार अनेकांनी काढले. पुणे महानगरपालिका स्थापन करायचे ठरले आणि त्याचे पहिले आयुक्त म्हणूर सदाशिवराव बर्वे यांची निवड करण्यात आली. पण पुण्यात रुजू व्हायच्या आधी मुंबई महानगरपालिकेचे कामकाज महिनाभर त्यांनी अभ्यासले. पुण्याचे जुने अहवाल त्यांनी वाचलेले होते. इथे कोणकोणत्या विभागात काथ प्रकारचं काम करायचं आहे याची पूर्ण कल्पना त्यांना आलेली होती. पुण्याची महानगरपालिका नव्याने स्थापन झालेली होती. नच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे लोकनियुक्त सभासदांची त्यांना टोचणी नव्हती. सल्लागार मंडळ होते; पण बर्वेसाहेबांचा आधीचा नावलौकिक ते जाणून होते त्यामुळे कारभारात त्यांनी फार लक्ष दिलं नाही आणि ते बर्वेसाहेबांच्या पथ्यावर पडले, ते इथे आले तेव्हा अत्यंत अकार्यक्षम महापालिका असा पुणे पालिकेचा लौकिक होता. करवसुली, रस्ते, ड्रेनेज, औषधोपचार व्यवस्था यांकडे दुर्लक्ष झालं होतं. कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार होती. त्यांना हाताशी धरून कारभार सुधारण्याचे धोरण बर्वेसाहेबांनी अवलंबलं. करवसुलीची थकबाकी १७-१८% होती. कर भरलेला नसेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कार्यवाही होऊ शकते हे लोकांना जाणवून देण्यात बर्वे यशस्वी ठरले आणि सहा महिन्यात कराच्या थकबाकीचं प्रमाण २.५० टक्क्यांवर आलं. हा एक विक्रमच म्हण्याला हवा! नियोजनबद्ध विकासाचा श्रीगणेशा : जानेवारी १९४९ ते जून १९५२ या अवध्या साडेतीन वर्षाच्या काळात सदाशिवराव पुणे महानगरपालिकेचे प्रशासक होते. १९४९ साली त्यांनी आयुक्त म्हणून कामास मुख्यात केली. सुरुवातीच्या सुमारे दीड वर्षात पालिकेत नगरसेवक नसल्याने सर्व सत्ता बर्वे यांच्याकडेच होती. त्यामुळे आपल्या अधिकारात त्यां भराभर कार्य करण्याचा सपाटा लावला.

Continued work in pune

पण त्यांची नियुक्ती झाली तेव्हाच त्यांच्याकडे पुढील तीन वर्षात करण्याच्या कामाया आराखडा तयार होता. अतिशय नियोजनबद्ध रीतीने त्यांनी पुण्याचा विकास पडवून आणला. रस्ते, पूल, बीज, दवाखाने, पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा, गृहप्रकल्प अश अनेक गोष्टींचा संपूर्णपणे विचार करून पुढील पंचवीस वर्षांच्या ‘सुंदर पुणे’ या संकल्पनेचा पाया त्यांनी घातला. महापालिका, कॅन्टोन्मेंट, पाटबंधारे विभाग, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, टपाल खाते, टेलीफोन या सर्व खात्यांमध्ये त्यांनी सुसूक्ता आणली, त्यांच्या कामाचा पाया शास्त्रशुद्ध आणि नियोजन पक्के असल्याने आणि योग्य कामासाठी गोव अधिकान्याची निवड करण्याचे धोरण असल्याने कामाला गती आली. पूर्वी मजुरांना माहिती नसायचे की कुठे जायचे आहे आणि काय काम करायचे आहे. दिलेला हुकूम फिरवला जाई आणि मजुरांचा दिवस आणि हेलपाटा वाया जाई. ही पद्धत त्यांनी मोडीत काढली, कोणत्या दिवशी कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे याचा पूर्ण तपशील तयार असायचा त्यामुळे फार्म वेळेत पूर्ण होऊ लागली. पुणे शहराचा चेहरामोहरा बदलू लागला. पुण्यात त्या वेळेला कमीतकमी खर्चात कामं व्हावीत म्हणून सेन्ट्रल स्टोअर’ ही अभिनन कल्पना राबवून त्यांनी कारखान्यातून थेट माल मागवायला सुरुवात केली.

रस्ते : त्या वेळी पुण्यातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल होत असे. उन्हाळ्यात रस्ते पुळीने भरून जात. काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते; पण अगदी थोडे. बर्वे आले आणि दोन वर्षात ४० मैल रस्त्यांचे डांबरीकरण झाले. सर्वात प्रथम जंगली महाराज रस्ता ८० फूट रुंद केला गेला. तिथल्या चौकाला आता ‘स.गो. बर्वे चौक’ असं नाव दिलं आहे. मध्यभागी तीस फूट रुंदीचा डांबरी रस्ता आणि दोन्ही बाजूला दहा फुटाचे काँक्रीटचा रस्ता सायकलसाठी राखीव करण्यात आला. आणि दोन्ही बाजूला १५-१५ फुटांचे पदपथ केले. नामदार गोखले मार्ग म्हणजेच फग्र्युसन कॉलेज रस्ता सगळीकडे सारख्या रुंदीचा करून घेतला गेला. मधला भाग ३० फूट आणि दोन्ही बाजूस १० फुटाचे पदपथ अशी रचना केली गेली. लक्ष्मी रस्त्याचे अनेक वर्ष रेंगाळत पडलेले काम बर्वेसाहेबांनी चातुयनि पूर्ण केले, रस्ता रुंदीकरणात आड येणारे मंदिर रातोरात हटवले. लोकाच्या सोबीसाठी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली. सोडियम व्हेपर लॅम्प्पा बसवून घेतले, धोक्याचे कोपरे गोलाकार करून घेणे, अरुंद रस्ते रुंद करणे, जड वाहनांना शहरात न येता परस्पर बाहेरून जाता यावे यासाठी सोय करणे अशा अनेक पायाभूत कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्यातल्या बव्हंशी पूर्ण केल्या.

आरोग्य : शहरातील रुग्णालयांचा दर्जा सुधारणे ही पहिली निकडीची गरज होती. महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर लगेचच दोन वेळा कॉलऱ्याची साथ आली. रोगाचे निदान लवकर व्हावे म्हणून पालिकेने लॅबोरेटरी सुरू केली. कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे जाणून या गोष्टी सुधारण्यावर भर दिला गेला. हिवताप नियंत्रणासाठी शहरभर फवारणी सुरू करण्यात आली. देवी रोगाच्या निर्मूलनासाठी डॉ. आद्रनवाला यांनी बर्थ्यांना मोलाची मदत केली.

मार्केट : वाढत्या शहराचा संभाव्य विस्तार लक्षात घेऊन बर्वेनी वेगवेगळ्या भागात मार्केट वसवण्याचे नियोजन केले. खाटिकखान्यात कोणती जनावरे न्यावी याचे नियम घालून दिले आणि त्याच्या वेळा ठरवून दिल्या. शहरात मध्यभागात पसरलेल्या टिंबर मार्केटसाठी बाहेर जागा उपलब्ध करून दिली. पण व्यापारी हलायला तयार होईनात तेव्हा बर्वेनी त्यांचा परवाना अडवून ठेवला. त्यांनी चातुयनि कायद्याचा योग्य उपयोग करून घेतला. हळूहळू पूर्ण मार्केट नवीन जागी गेले. उद्याने आणि बागा शहर नियोजनाभावी कसेही वाढले होते, एकप्रकारचा विस्कळीतपणा जाणवत होता. त्यात लोकांच्या सोयीसुविधांचा विचार अभावानेच केला गेला होता. हे सगळं बदलायचं तर त्यासाठी लोकांना विरंगुळा मिळेल, शुद्ध हवेत मोकळेपणाने हिंडता येईल अशी सोय करणे गरजेचे होते. म्हणून बर्वेसाहेबांनी बागा आणि उद्याने विकसित करण्याची योजना आखली. शहराची शोभा वाढवणारी उद्याने आणि त्यातील वृक्षसंपदा जोपासण्यासाठी वनविभाग सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. ‘संभाजी बाग’ तसंच ‘पेशवे पार्क’ यांच्या निर्मितीची पूर्ण संकल्पना बर्वेसाहेबांचीच! संभाजी बागेत तयार करण्यात आलेले मत्स्यालय, बँडस्टैंड, कारंजी आणि वृंदावन गार्डनप्रमाणे लावलेले अंडरवॉटर रंगीत दिवे, दोन्ही बाजूंनी सोडतून पाणी सोडणाऱ्या आणि मध्ये लक्ष्मीची मूर्ती असलेल्या लेण्याची निर्मिती, लहान मुलांना खेळायला भाड्याने तीन चाकी सायकल आणि छोट्या मोटारी चालवण्याची सोय आणि रस्ते त्यांनी करवून घेतले. दिवाळीत लहान मुलांच्या किल्ले तयार करण्याच्या स्पर्धा, बागकामाच्या स्पर्धा, फळेफुले यांचे प्रदर्शन हे सर्व संभाजी बागेत त्यांनी केलं. खत निर्मितीची योजना करून त्यांनी त्यातून उत्पन्न मिळवून दिलं. पेशवे पार्क येथे थोडक्या खर्चात केलेली कलात्मक रचना, लहान मुलांसाठी फुलराणीची कल्पना, बोगदा, जपानी पागोडा आणि पूल तसंच बोटिंगची सोय, मुलांची लाडकी सुमित्रा हत्तीणीची स्वारी, प्राणी संग्रहालय या लहान मुलांच्या सहलीसाठी विकसित केलेल्या सोयी यातून त्यांच्या आधुनिक विचारशैलीची झलक पाहायला मिळते.

नदी सुधार योजना : नदीचे तेव्हाचे स्वरूप बदलायला हवे याची बर्वेसाहेबांना जाणीव होती. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असलेली विस्तीर्ण हिरवळीची जागा लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळी पटांगणे म्हणून विकसित करावी अशी कल्पना त्यांनी मांडली. मैदानांचे रूपांतर पटांगणे आणि क्रीडांगणात करून त्यांनी नागरिकांसाठी चांगलीच सोय केली.

उद्योगधंदे : पुण्याचा विविध बाजूंनी विकास सुरू झाला. इंजिनियर्स लोकांना प्लॅन्स बनवायला सांगून ते खर्चाचा अंदाज घेत. त्याप्रमाणे किती पैसे लागतील, त्याची तरतूद कशी करायची, याचा विचार करताना त्यांच्या लक्षात आलं की शहराचे आणि शहरवासियांचे उत्पन्न वाढवायचे तर उद्योगधंदे सुरू करायला हवेत. पुणे-चिंचवड, पुणे- सातारा, पुणे-हडपसर अशा अनेक मार्गावरील मोकळ्या जागेत त्यांनी औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची योजना आखली. तिथले गाळे लोकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिले आणि उद्योग व्यवसायाला चालना दिली. नवनवे कारखाने उभे राहू लागले आणि पालिकेचे उत्पन्न वाढू लागले. औद्योगिक वसाहती निर्माण करणे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शक ठरले आहे. ते सकाळी सात वाजल्यापासून काम सुरू करत. त्यांचा कामाचा झपाटा विलक्षण होता. पूर्वीच्या काळी जसे राजे महाराजे वेश बदलून प्रजेमध्ये जाऊन त्यांची सुखदुःख समजून घेत तसेच बर्वेसाहेबही न सांगता अचानक एखाद्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत. ते काम कोण पाहते आहे, ते सध्या कोणत्या स्थितीत असायला हवे हे त्यांना माहिती असे. आणि जर ते तसे नसेल तर त्या अधिकाऱ्याला त्याचे कारण द्यावे लागे. अगदी सकाळी व्यायामासाठी फिरायला जातानाही ते अचानक एखाद्या कामावर जात असत. त्यामुळे लोकांना त्यांचा दरारा वाटे आणि कामे लवकर पूर्ण होण्यासाठी त्याची मदत होत असे. बर्वेसाहेब कोणत्याही गोष्टीची आखणी करण्याआधी त्या गोष्टीचा सांगोपांग विचार करत, अधिकारी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत, मालाअभावी कामे अडू नयेत म्हणून कच्च्या मालाची पुरेशी तरतूद करत आणि त्यातूनही काही अडचणी आल्या तर त्याला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायी आरखडा (प्लॅन) तयार असे. एकदा ड्रेनेज खात्यातील मजुरांनी संप करण्याची धमकी दिली. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करूनही ते संप मिटवायला तयार होईनात तेव्हा सोलापूर, सुरत, मुंबई इथून पर्यायी मजूर आणण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि संप मोडून काढला. त्यांचे कोणतेही काम वेळापत्रकानुसार चाले. दर सोमवारी कामाच्या वेगाचा तपशील दाखवणारे पत्रक त्यांच्या टेबलावर आले पाहिजे, असा नियम त्यांनी घालून दिला होता. आठवड्यातील एकेक दिवस एकेक विभागबार मुख्य ऑफिसला दिलेला असे. कामाची प्रत्यक्ष पाहणी आणि चर्चा यांमुळे काम अडून राहात नसे. निर्णय तत्परतेने दिले जात असत. नगरपालिकेच्या कामाचा वार्षिक अहवाल वेळेवर निघाला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. मुंबईला जाताना अनेक प्रकरणे घेऊन जात आणि महानगरपालिकेची बाजू खंबीरपणे मांडून त्या प्रकरणाचा निकाल लावून येत. या सर्व कार्यात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या सहकार्याची. श्री. नेऊरगावकर, श्री. आद्रानवाला, श्री. जाधव अशा अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीची जडणघडण बर्वेसाहेबांच्या संगतीने झाली. सर्वांच्या मनात बर्वेसाहेबांविषयी अपार कृतज्ञता होती.

आत्ता आपल्या पुण्यात मेट्रो आली म्हणून आपण सगळे आनंदून गेलो आहोत. पण या पुण्याभोवती गोलाकार पद्धतीने रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी अशी नुसती इच्छा व्यक्त करून न थांबता त्याचा संपूर्ण आरखडा बर्वेसाहेबांनी त्या काळी तयार केला होता. भविष्यात होणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पी.एम.टी. अपुरी पडणार आणि पुण्याभोवती वाढती लोकसंख्या बघता सबअर्बन वाहतुकीची गरज भासणार हे लक्षात घेऊन दापोडी, खडकीपासून सुरू होणारी गोलाकार रेल्वे पुण्याचा पश्चिम भाग, दक्षिण भाग, पूर्व बाजूला मार्केट यार्ड परिसर, पुढे मिरज, सोलापूर रेल्वे लाईन, मुळा-मुठा ओलांडून येरवडा, वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी येथून पुन्हा कासारवाडीला येऊन मिळेल असा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग १९५२-५४ च्या सुमारास आखणारे स. गो. बर्वे हे किती द्रष्टे होते याचं प्रत्यंतर येतं.

वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर होते. आपला वेळ इतर गप्पाटप्पांमध्ये जाऊ नये. म्हणून त्यांनी टेबलावर दोन लहान पाट्या लिहून ठेवल्या होत्या. I am busy आणि Please be brief. ‘मी कामात आहे’ आणि आणि ‘आपले म्हणणे थोडक्यात सांगा’ या पाट्यांबरोबरच मुंबई कॉर्पोरेशनचे संस्थापक फिरोजशहा मेहता यांचे एक बचन त्यांनी खोलीत मुख्य जागी लावले होते, ‘अधिकाराची अंमलबजावणी बिनधोक आणि कार्यक्षमतेने व्हावयास हवी असेल तर तो अधिकार एकच व्यक्तीचे हाती सुपूर्द करावा.’ (युनिटी ऑफ कमांड)

त्यांच्या ऑफिसात मागील भिंतीवर एक फलक होता, मी एक रस्त्याने जाणारा प्रवासी आहे आणि आज इथे मुक्काम केला आहे. मला जे काही चांगले करायचे असेल ते आत्ताच केले पाहिजे’. जीवनाविषयी त्यांचा दृष्टिकोन असा होता. आणि त्यामुळेच ते सतत कार्यरत असत.

आपल्या परिचितांनी, नातेवाइकांनी आपले काम करून घेण्यास आपल्याला भीड घालू नये म्हणून ते प्रसंगी कठोरपणे बागत. हस्तक मध्यस्थांना त्यांच्या कचेरीत मज्जाव होता. पण रास्त तक्रार किंवा मागणी असेल तर त्याचा जरूर विचार करत. इथे एक उदाहरण देणे उचित ठरेल. थोरल्या माधवरावांच्या थेऊर येथील वाड्याची वास्तू राम माधव स्मृती मंडळाला मिळावी यासाठी महामहोपाध्याय द.वा. पोतदार यांनी बर्वेसाहेबांना विनंती केली आणि लगेच ते काम मार्गी लागले. बर्वेसाहेबांना आपल्या इतिहासाचा अभिमान होता. थोरल्या बाजीरावांचे जीवन चरित्र लिहावे, अशी त्यांची इच्छा होती; पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पुणे महानगरपालिकेतून बदली झाल्यावर मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून सर्वांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करावी हे त्यांचं कर्तृत्व !

Back to pune

पानशेत धरण समस्या आणि बर्वेसाहेब १२ जुलै १९६१ या दिवशी पानशेत धरण फुटले. आपल्या प्रिय पुण्याच्या रक्षणासाठी बर्वेसाहेब धावत आले. त्यांची उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली, त्यांनी भराभर निर्णय घेण्यास सुरुवात केली. सरकारी अधिकान्यांच्या विश्रामगृहाचे रूपांतर बॉर रूममध्ये करण्यात आले. या काळात ते दिवसाचे २०-२० तास काम करत असत. सात लाख लोकवस्तीच्या या शहराचे पुनर्वसन ही साधी बाब नव्हती. आधी सगळा गाळ आणि घाण काढून स्वच्छता सुरू केली. रोगराई पसरू नये, म्हणून आरोग्य सुविधा देण्यात आल्या. पहिल्या चार दिवसांत बीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. खडकवासल्याचा मुख्य स्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत त्यांनी प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्यांचे हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिले. पाणीपुरवठा, बीजपुरवठा, संपर्क व्यवस्था पूर्ववत् करण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत घेतली. लोकांना तातडीची मदत, दळणवळण यासाठी एक मालकांना अल्पदरात ट्रक देण्याची विनंती करून ट्रक ताब्यात घेतले. त्या मंडळींनीही बर्वसाहेबांच्या शब्दासाठी माणुसकीच्या दृष्टीने पूर्ण सहकार्य केलं. शहराची पुनर्बाधणी, नव्या वसाहती वसवण्याचा आराखडा अशी अनेक पातळ्यांवरची लढाई अथक परिश्रमांनी त्यांनी यशस्वी करून दाखवली. प्रसंगी लष्कराचे सहकार्य घेतले. दोनतीन महिन्यात परिस्थिती काबूत आणली.

पैशांच्या व्यवहारात अतिशय चोख असलेले बर्वेसाहेब स्वतःच्या कोणत्याही खर्चाचे बिलाचे पैसे चेकने भरत. त्यांना भ्रष्टाचार आणि लांगूलचालन याचा अतिशय राग होता.

श्री. स. गो. बर्वे हे १९४७ साली पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले. तेथील कार्यालयात कार्यप्रणाली मध्ये सुधारणा करत ‘लोकाभिमुख’ कारभार केला, दप्तर दिरंगाईला थारा न देता दिलेली काम विशिष्ठ वेळेत पूर्ण करण्यावर भर देत. पूर्ण झालेल्या कामांची योग्य नोंदणी केल्यानंतर जुन्या निरुपयोगी दप्तराची विल्हेवाट लावत शिस्तबध्द कारभार त्यांनी केला. आज ज्याला ‘झीरो पेंडन्सी’ म्हणतात ती त्यांनी त्या काळात राबवली.

३० जानेवारी १९४८ हा सदाशिवराव बर्वे यांच्या कार्यक्षमतेची कसोटी घेणारा काळ ठरला. वर्षभरापूर्वी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची धुरा सांभाळणारे, पुण्याची सखोल माहिती असणारे, जबाबदारीची पूर्ण जाणिव असणारे ते कुशल प्रशासक होते. महात्मा गांधींची हत्या झाली होती. पुण्याच्या नथुराम गोडसे नावाच्या एका ब्राम्हण माणसाने गांधीजींना मारले होते. अनेक अफवांना उधाण आले होते, देशभरात, जनक्षोभ उसळला होता. पुणे हे अतिशय संवेदनशील शहर बनले होते. दंगल, जाळपोळ याचे लोण सर्वत्र पसरत होते. या आणिबाणीच्या काळात स्वतःच्या अधिकारात त्यांनी लष्कराला पाचारण केले. श्री. बर्वे यांना आपण घेत असलेल्या निर्णयाची, होणाऱ्या परिणामाची पूर्णकल्पना होती. ते अतिशय काटेकोरपणे कठोर आज्ञा देत होते व अधिकारी त्यांच्यावरच्या विश्वासाने त्या पाळत होते. संचारबंदी लागू करुन पुणे शहराची नाकेबंदी करत, फरासखाना हे पुण्याचे ‘इमर्जन्सी हेडक्वार्टर’ बनले होते. सर्वांना आपापल्या परीने सुरक्षा मिळाली. नंतरच्या शांततेच्या काळात दोन्ही बाजूच्या लोकांनी श्री. बर्वे यांना धन्यवाद देत “बर्वे होते म्हणून अनर्थ टळला” असे उद्‌गार अनेकांनी काढले.

१९४८ साली पुण्याचे वातावरण व नागरी सुविधांचा स्तर अत्यंत खालावलेला होता. शहराची वाढती लोकसंख्या, वाढणारी वाहने, अरुंद रस्ते, अस्वच्छता, रोगराईला, वेगवेगळ्या संसर्गजन्य साथीला आमंत्रण देणाऱ्या वस्त्या. शाळा, रुग्णालये वगैरे सुविधांची कमतरता, अशा सर्व परिस्थितीचे कारण म्हणजे बेशिस्त, दप्तर दिरंगाईचा कारभार, व नगरातल्या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुनियोजनाचा अभाव, व सर्वांगीण प्रगती साठी आवश्यक असणाऱ्या जाणिवांच्या कमतरता, या सर्व त्रुटींचा सखोल अभ्यास व त्याबद्दलची त्यांना झालेली माहितीची शासनाने नेमलेल्या राज्यस्तरीय नगर नियोजनाच्या ‘भट कमिशन’ पुढे पुण्याचे जिल्हाधिकारी या नात्याने श्री. स.गो. बर्वे यांनी दिलेली साक्ष भट कमिशनच्या अहवालासाठी अत्यंत महत्वाची ठरली.

१५ फेब्रुवारी १९५० साली पुणे नगरपालिकेचे पुणे महानगर पालिकेत रुपांतर झाले. ही प्रक्रिया व्यवस्थितपणे अंमलात आणण्यासाठी सुमारे वर्षांची पूर्व तयारी पूर्ण व्हावी ह्या दृष्टीने १८ जानेवारी १९४९ रोजी श्री. स. गो. बर्वे यांची पुणे नगरपालिकचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली व अस्तित्वात असलेल्या नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे दिले व सूत्रे आयुक्तांकडे सोपवली. पुणे महानगरपालिकेमध्ये शेजारील उपनगरे समाविष्ट व्हावयाची होती. तसेच कार्यक्षेत्राचा विस्तार व समस्यांची जाणिव असलेल्या सदाशिवरावांनी विचारपूर्वक “योजक” म्हणून अतिशय वेगाने सुधारण्याचे कार्य चालू केले.

अमंत्रम् अक्षरं नास्ति, नास्ति मूलमनौषधम् । । अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ।।

असे म्हणतात.

। असे अक्षर नाही ज्यात मंत्राची ताकद नाही । अशी मुळी नाही ज्यात औषधाची ताकद नाही ।

कुणीही मनुष्य अयोग्य नसतो ।। तर वनवा असते समर्थ योजकाची ।।

श्री. स. गी. बये हे असे कुशल व समर्थ योजक होते. सर्व संसाधनांचा रास्त उपयोग करून घेत. उद्देश कसा साधावयाचा हे ठरवत योग्य प्रकारे अंमलबजावणी करत. पुणे

नगरपालिका आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारण्यापूर्वी महिनाभर मुंबई महानगर पालिकेत विभागवार कामकाज कसे चालते याची पहाणी केली, पुणे शहराचे जुने अहवाल त्यांनी अभ्यासले.

उत्पन्न कसे वाढवता येईल, कर्ज किती व कसे घ्यावे लागेल याचे आडाखे बांधून त्यांनी कामाला सुरवात केली. ते येथे आले तेव्हा अत्यंत अकार्यक्षम नगरपालिका असा पुण्याचा लौकिक होता. करवसुली, रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, औषधोपचार व्यवस्था याकडे दुर्लक्ष झाले होते. कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारादरम्यान होती. तरी कामाचा उठाव व्हावा तसा होत नाही हे त्यांच्या लक्षात आले.

पुणे महानगर पालिकेचा कारभार सुधारणा दर सोमवारी सर्व खाते प्रमुखांचे बैठक घेऊन

कोणती कामे करावयाची यांची योग व्यवस्था करण्यात येत असे प्रत्येक विभागाला एक दिवस देण्यात येत असे. त्या वेळेच्या २ दिवस आधी आठवड्याच्या कामाची माहिती आयुक्तांकडे द्यावी लागत असे, त्याचा अभ्यास करून आयुक्त त्याचा पाठपुरावा करत काही समस्या उद्भवल्यास मीटिंग मध्ये ते चर्चा करून तात्काळ निर्णय देत. यामध्ये प्रत्येक कामाचे वेळापत्रक व अंदाजपत्रक प्रथम तयार करून त्या प्रमाणे काम होते किंवा नाही हे पाहिले जात असे, स्वतः सकाळी फेरफटका मारण्यासाठी थेट कामावर जात असत.

श्री. स.गो. बर्वे यांच्यासारखा चांगल्या कामाची दखल घेणारा प्रशासक / अधिकारी अग्रस्थानी आहे ही जाणीव राज्यकारभार सुधारण्यास उपयुक्त ठरते, तसेच कामात हेळसांड अथवा दिरंगाई झाल्यास क्षमा केली जाणार नाही ही जरबही होती.

मध्यस्थांना मज्जाव व नागोरकांना थेट भेट व त्यांच्या समस्याचे निराकरण, यामुळे ते सर्व नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले, तसेच पुणे मनपा च्या सेवकांच्या, विशेषतः चतुर्थ श्रेणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात, तसेच त्यांचे वाढदिवसही साजरे करण्यात त्यांनी अधिकारी य

कामगार यांच्यात चांगला समन्वय घडवला.

अनेक अधिकारी त्यांच्या हाताखाली काम करण्यात धन्यता मानत त्यांना गुरुस्थानी मानत. त्यामुळे २५ वर्षात होणारी कामे फक्त ३३ वर्षात केली गेली असे. मिटी इंजिनिअर स.के. नेरगावकर नमुद करतात.

१) करसंकलन :- करवसुलीची थकबाकी १७ ते १८% होती, त्यांनी करवसुलीची

मोहीम कसोशिने राबवत ६ महिन्यात हे प्रमाण २% ते २.५% टक्यावर आणले, कारभाराला शिस्त लावली. दप्तर दिरंगाईला थारा न देता सरकार दरबारी प्रलंबित असणारे प्रकरण म्हणजे नगरपालिका क्षेत्रात घरांचा शासकिय कर नगरपालिकेकडे घेऊन नाममात्र कर शासनाकडे हया ७ ते ८ वर्षे प्रलंबित प्रकरणाचा तड लावण्यासाठी ते मुंबईला गेले व निकाल लाऊन आणल्याने मालमत्ता कराचे पालिकेच उत्पन्न १० लाखावरुन २५ लाखावर गेले.

२) आधुनिकीकरण: जकात उत्पन्न वाढी बरोबरच जकातीसाठी लागणारी तपासणी सुलभ व्हावी व रहदारीच्या आड येऊ नये म्हणून बोपोडी येथील जकात नाक्यासाठी मोठी जागा घेऊन जकात नाक्याचे बांधकाम केले. तसेच जकात नाक्याना टेलिफोनच्या सेवा उपल्ब्ध करून देत कार्यक्षमता वाढवली. (उदा. बोपाडी जकात नाका मुंबई पुणे रस्ता.)

३) पुणे महानगरपालिका वाहन व्यवहार कं. (PMT) स्थापना मुंबई सरकारच्या

राष्ट्रीयकरण धोरणाने सिल्वर ज्युबिली या खाजगी संस्थेकडे असणारी व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्टकडे घेतली व त्यामुळे नागरिकांच्या सोई बरोबरच महापालिकेचे उत्पन्न वाढले.

४) शॉपिंग सेंटर्स : या मोक्याच्या जागी विकास करत शॉपिग सेंटर्स व नव्या कॉलनींची वाढ करुन महापालिकेचे उत्पन्न वाढवले व नागरीकांची सोय झाली. तळमजल्यावर दुकाने व वरच्या मजल्यावर म.न. पा. कार्यालये उदा. शनिपाराजवळची इमारत.

५) सेवा सुविधा :- ड्रेनेज स्वछतेसाठी अधुनिक मशीनरी आणली. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन विविध ठिकाणी जास्त व्यासांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजना राबवल्या प्रेशर वाढीसाठी टिळक रोड वर १२” वॉटर लाईन टाकली. तसेच उच टाक्या बांधल्या.

६) नदी सुधार योजना: पावसाळ्यात नदीचे पात्र मोठे असते तर उन्हाळ्यात व हिवाळ्यात पाणी आटत जात असल्याने नदीपात्रात डबकी साचतात या साठी पाणी

सतत वहाते ठेवण्यासाठी ५० ते १०००-०” रुंदी ठेऊन दोन्ही बाजुला दगडी भिंती बांधल्याने उन्हाळ्यात व हिवाळ्यात नदीचे पात्र मर्यादित असेल व दोन्ही बाजुला असणारी पावसाळी नदी पात्रात विस्तीर्ण मैदाने समपातळीत सपाट ठेऊन त्यावर हिरवळ लावणी व त्यावर कारंजी तयार केली.

६) रस्तारुंदी योजना: अरुंद रस्ते वाढती वाहन संख्या यासाठी रस्ता रुंदी योजना तयार करण्यात आल्या. तसेच सुलभ वहातुकीसाठी चौकातील कोपरे गोलकार केले. तसेच ८०’ रुंद जंगली महाराज रस्ता ५०-०” रुंद गोखले रोड (एफ.सी. रोड) तयार केले. ८००-०” शंकरशेट रोडची आखणी.

२ वर्षात बरेच वर्ष प्रलंबित रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण ४० मैल लांबीचे रस्ते सुधारले व त्यामुळे स्वच्छ पुणे सुंदर पुणे सार्थ केले.

७) शहराचे कचरा व्यवस्थापन:- त्यामध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच पुण्याच्या

दक्षिणेस असलेला खोलगट भाग नाहीसा केला व आजचे सणस स्पोर्टस् ग्राइंड तयार झाले. कचरा वाहतुकीसाठी मोटारींची व्यवस्था-

८) समाविष्ठ गावांचा विकास पुणे नगरपालिकेचे क्षेत्र महापालिका तयार होताना विस्तारले. त्यात, औंध, बोपोडी, कोंढवा, मुंढवा, हडपसर, या प्रत्येक उपनगरात, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे, मंडई, या बरोबरच लागणारे रस्ते जरुरीच्या सामानाची दुकाने (Essential shops) व त्या बरोबर पथदिवे यांची सोय केली. तसेच भविष्यातील वाढीकरता जागा आरक्षित केल्या.

) आधुनिक कत्तलखाना कोंढवा येथे आधुनिक कत्तलखाना तयार केला. व ९

त्यामध्ये जनावरांची आरोग्य तपासणी करुन नंतरच ती कापण्यात येतात. इतर ठिकाणी जनावरे कापण्यास मनाई तसेच रात्री ३ वाजता कापलेली जनावरांचे मांस सकाळी ७ पूर्वी मोटारीने आणून त्याची विक्री दुपारी १।। पर्यंत व्हावी अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे रोगराई पुष्कळ प्रमाणात आटोक्यात आली.

१०) उद्याने व बागा: पुण्यात संभाजी उद्यान, पेशवे उद्यान तसेच कमला नेहरू उद्यान, घोरपडे उद्यान, शाहू उद्यान या सारखी सार्वजनिक उद्याने तयार करण्यात आली.

गार्डन सुप्रिटेंडण्टची नेमणूक केली. नदीकाठाच्या दोन्ही बाजूला हिरवळीची मैदाने तयार करण्यात आली. ही उद्याने पुढच्या काळात चांगली विकसित होत गेली,

११) आधुनिक पोहण्याचा तलाव शाहु उद्यानात आधुनिक पध्दतीचा स्वच्छ पाण्याचा (Filter Water) पोहण्याचा तलाव तयार केला.

१२) सुनियोजित टिंबर मार्केट पूर्वी लाकडाच्या वखारी दाट लोकवस्ती असलेल्या जागी विखुरलेल्या होत्या. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यासाठी भूसंपादन करून तेथे ८०-०” मुख्य रस्ता व ५००-०” ते ४०-०” मार्केट मधले रस्ते तयार करून व्यवस्थित प्लॉट पाडले. तसेच नागझरी (वहाणारा नाला) वर कायम स्वरुपाचे पूल बांधले, योग्य प्रकारे नागझरीचे क्षेत्र निर्धारित केले.

१३) सोनावणे हॉस्पिटल सदर इमारत बांधताना त्या काळी Raft Foundation आधुनिक तंत्राचा वापर केला गेला होता.

१४) डॉ. नायडू हॉस्पिटल साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी डॉ. नायडू हॉस्पिटल शासनाकडून ताब्यात घेतले व त्याचे रिनोव्हेशन करत आरोग्य व्यवस्था सुधारली.

१५) रोगनिदान तपासणी केंद्र तपासून रोगनिदान लौकर झाल्याने साथीच्या रोगांवर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार करणे सोपे झाले व रोगराईचे उच्चाटन झाले.

१६) V. D. क्लिनीक

१७) स्वच्छ पुणे- सुंदर पुणे :- अनेक रोगांचे मुळ अस्वच्छतेत असत्यामुळे

स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षक व सेवक यांच्याकडून चांगले काम करवून घेतले.

तसेच घर न घा-हे DDT च्या फवाऱ्याने धुवून घेतले. डासांची डबकी होणार

नाहीत अशी काळजी घेतली. यामुळे हिवतापाच्या रोग्यांची संख्या ५ हजारावरून १

हजागकर आली. हिवताप, देवी, कॉलरा, वगेरे साथी आटोक्यात आणण्यासाठी

लसीकरण मोहीम व कोईनल वगैरे औषधांची व्यवस्था व लक्षणे दिसल्यास लगेच

जावडू हास्पिटलमध्य उपचार यांची सोय करण्यात आली. त्यामुळे माधीच्या रोगाचे

उच्थाटन झाल.

१८) संभाजी पूल (लकडी पुलाचे काम):- श्री. स. गो. बर्वे यांच्या कार्यकाळात लकडी पूलाचे विस्तारणीकरणाचे / एकजिव करण्याचे काम एका वर्षात करण्यात आले. या कामाकरिता श्री. बर्वे साहेबांनी P.W.D. मधील निवृत्त मुख्य इंजिनिअर श्री. काळ यांची नेमणूक केली व त्यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण करण्यात आले.

१९) गणपती चौक येथील मंदीर लक्ष्मी रस्त्याच्या मध्यभागी असलेले गणपतीचे, मंदीर हलवले, हे करताना अगोदर रस्त्याच्या कडेला महापालिकेने मंदीर बांधून तयार केले व रात्रीत जुने मंदीर हलवले व नंतर माघी चतुर्थी (गणेश जन्म) या दिवशी शंकराचार्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना केली.

२०) सेवकांसाठी घरे :- पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठी अंबील ओढा कॉलनी, साने गुरूजी वसाहत, मंगळवार पेठ येथे चाळी बांधण्यात आल्या, या बांधताना कमीत कमी खर्चात जास्त सेवकांची सोय करण्यात आली. त्या वेळी प्रसंगी विटा देखील जागेवरच तयार करण्यात आल्या, काही कामात बैठ्या चाळी बांधतांना त्याचा खर्च ५ ते ६ रु/प्रति स्के. फूट आला.

२१) शिथिलता नष्ट केली: रस्ते व बांधकामासाठी वेळच्या वेळी लागणारी साहित्य सामग्री यांची योग्य प्रकारे तरतूद व व्यवस्थापन करून कामाचा उठाव कित्येक प्रमाणात वाढवला या साठी (Central store) मध्यवर्ती कोठीची संकल्पना राबवली, त्यामुळे बाजारात कितीही टंचाई असली तरी माल पुणे महापालिकेसाठी कारखान्याच्या कडून थेट उपलब्ध झाला. दांडेली येथून लाकूड, म्हैसूर – भद्रावती येथून नळ वगैरे साहित्य, दर्जेदार व रास्त भावात उपलब्ध झाले.

२२) विद्युत विभागाचे आधुनिकीकरण :- पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय

विश्रामबागवाडा येथे होते. सदर इमारतीत अंधाऱ्या खोल्या होत्या, तेथे कार्यालयात ट्युब लाईटस बसवण्यात आल्या, १९५० साली प्रारंभी प्रमुख रस्त्यावर ४० चंट विजेचे दिवे होते पण ते दिवे कमी प्रकाशाचे होते. प्रमुख रस्त्यावर व चौकात ते काढून ६० ते १०० चंटचे दिवे लावले. पुणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर मर्क्युरी दिवे लावण्याचा प्रथम प्रयोग झाला. या दिव्यामुळे पूर्वीच्या खर्चात अधिक

प्रकाशाची सोय झाली. प्रारंभी स्वारगेट ते संभाजी पूल व नंतर जंगली महाराज रोड व शिवाजी रोडवर या प्रकारचे दिवे लावण्यात आले.

२३) म्युनिसिपल गॅझेट १ ऑक्टोबर १९४९ रोजी विजया दशमीच्या सुमुहूर्तावर ‘म्युनिसिपल गॅझेट’ हे पाक्षिक सुरु केले. १९५२ साली लोकनियुक्त प्रतिनिधींनी त्याचे नाव ‘नागरी जीवन’ ठेवले या पाक्षिकाने महापालिकेच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचली.

Investment in Men माणसातली गुंतवणूक –

डॉ. अद्रानवाला कडक लष्करी शिस्तीचे, प्रामाणिक कार्यात झोकून देणारे आरोग्य प्रमुख म्हणून नेमले. ते स्वतः सकाळी ७ वाजता शनिपाराजवळ हजर राहून प्रत्येक विभागाची त्या त्या आरोग्य अधिकाऱ्याबरोबर पहाणी करत. त्रुटी आढळल्यास सेवकांना स्वतः खराटा घेऊन कचरा कुंडी-मुतारी, वगैरे साफ करून दाखवत. चुकीला क्षमा नाहीं. तसेच चांगल्या कामाचे. कौतुक करत.

रात्री अपरात्री भाकड जनावरांचे वस्तीतून कोंडवाडयाला न्यायला लागल्यास त्या सफाई कामगारांबरोबर स्वतः जाऊन नंतर सफाई कामगारांना स्वतःच्या मोटारीने घरी पोहचवत. सफाई कामगारांचे प्रश्न व अडचणी सोडवत.

कॉलऱ्याची साथ आली असताना नायडू हॉस्पिटल येथील मेडिकल ऑफिसर श्री. डोगरे यांना ताबडतोब मदतीसाठी आणखी डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ, औषधे व लागणाऱ्या गोष्टींची उपलब्ध करून कार्यतत्परतेने साथ आटोक्यात आणली.

P. F. Bode व D. V. Deshpande Young & energetic तरुण हे दोघे असिस्टंट इंजिनियर म्हणून पुणे महानगरपालिके त रुजू झाले व दररोज १०-१० तास काम करत पुण्याचे स्वरूप भगभर बदलले. पुण्याला चांगले अधुनिक शहर बनवत मोलाचा वाटा उचलला. पुढे पी.एफ. बोड हे शहर अभियंता झाले व पुण्यातील अनेक प्रकल्पांत त्यांनी योगदान दिले. सध्याची पुणे म.न.पा. च्या मुख्य इमारतीचे कामाचे सुपरव्हिजन बोड साहेबांच्या टीमने केले. त्यात श्री. नांबे, जठार, पटवर्धन, (मिती) वगैरेंचा समावेश होता. तसेच १२ जुलै १९६१ साली पानशेत पुरानंतर पुर्नवसनासाठीही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.

श्री देशपांडे हे रस्ता विभागाचे प्रमुख होते. त्यांनी तडफदारपणे रस्ते सुधारणा करत पुण्याचा विकास केला. तसेच १९६१ च्या पुरानंतर पुनर्वसन कामात महत्वाची भूमिका बजावली.

श्री. पंडीत हे एस.टी. महामंडळात वरिष्ठ अधिकारी होते. पी.एम.टी. चे कामात मोलाचे योगदान दिले.

श्री. फावडे हे राज्य शासनाच्या मामलेदार कचेरीत हवेली तालुका येथे द्वितीय श्रेणी अधिकारी होते. श्री. स. गो. बर्वे हे जिल्हाधिकारी असताना त्यांना श्री. फावडे यांचे कार्यकौशल्य समजले. पुणे म.न.पा.त ते भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी भराभर जागांची खरेदी व (शासकिय कायद्यात) अॅक्विझिशन प्रोसेस करण्यात व १९६१ साली पुरानंतर मोठ्या भूखंडाचे संपादन करण्यात श्री. बर्वे यांना मोलाची मदत केली. श्री. फावडे हे नंतर पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त झाले.

श्री. बोडस, हे पी.डब्ल्यु.डी. मध्ये कार्यकारी अभियंता होते. १९६१ साली त्यांनी पुण्याच्या आपत्‌कालीन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून मुळशी योजना त्वरेने साकारण्यात महत्वाची भूमिका बजावली.

म.न.पा. सेवकांच्या प्रशिक्षणाची/नव्या जबाबदाऱ्यासाठी/ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी पालिकेच्या खचनि सेवकांना विविध ठिकाणी देशात व परदेशात पाठवण्याची सुरवात केली.

श्री. स. गो. बर्वे हयांनी पुण्याच्या सुधारणा घडवत असताना पुढील आयुक्तासाठी मार्गदर्शक सूची तयार केल्या. तसेच उद्याचे पुणे हा पुढील २५ वर्षासाठी नगर नियोजनाचा आराखडा तयार केला. त्याचा पहिला टप्पा म्हणून संगमवाडी विकास योजना १९५२ साली ही पुणे म.न.पा. मध्ये मंजुर करून एक वर्षात (१९५३) शासनाची मंजुरी मिळाली. पुढच्या २५ वर्षात त्याची अंमलबजावणी टप्याटप्याने होईल असा विकास आराखड्यामध्ये पुण्याचा सर्वाकश सर्वांगीण विकास होण्यासाठी गोलाकार रेल्वे योजना आखली. नगर नियोजनासाठी इंजिनियरिंग कॉलेजची मदत घेतली. तसेच मुंबईचा विकास आराखडा तयार करणारे इंजिनियर श्री नानासाहेब मोडक यांचे मार्गदर्शन घेतले. पुणे शहराच्या विकास आराखडयासाठी अर्थतज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले, नगर नियोजन अधिकारी म्हणून इंजिनिअर श्री. ओक यांची नेमणूक केली.

गोलाकार रेल्वे ही पुण्याच्या पश्चिम भाग कोथरुड, कर्वेनगर (हिंगणे) त्यानंतर पर्वती, मार्केटयार्ड, महमंदवाडी, कोंढवा, मुंढवा, येरवडा, धानोरी, खराडी मार्गे आळंदी विश्रांतवाडी, कासारवाडी मार्गे मुंबई पुणे रेल्वेला मिळेल. त्याच बरोबर कोळयाच्या जाळयाप्रमाणे ८०-० व १०००.०” रुंदीचे २ रिंग रोड व मध्यवर्ती ठिकाणे जोडणारे सर्व दिशेने गोलाकार रिंग रोड स्टेशनला मिळणारे ५००-०” व ४००-०” उपरस्ते याची सोय सुचवण्यात आली. पुण्याच्या विकासाचा हा पाया आहे व नागरिकांनी मास्टर प्लॅनवर उलट सुलट प्रतिक्रिया द्याव्यात अशी सूचना केली.

१९५२ नंतर पुढच्या काळात पुण्याचे नगर नियोजन व अंमलबजावणी करताना या सूचनांचे तरतुदींचे योग्य पालन केले गेले नाही. असे खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे गोलकार रेल्वेचा प्रस्ताव टप्प्याटप्प्याने अंमलात आणला असता तर पुण्याची सार्वजनिक वहातूक व्यवस्था कोलमडली नसती व पुण्याच्या सर्वांगीण विकास झाला असता.

नगर नियोजन रचनाकार प्रा. रा.ना. गोहाड असे नमूद करतात श्री. सर्व बर्वे यांच्या I १९५२ च्या मास्टर प्लॅन मधील तरतुदींचा संपूर्ण समावेश १९५८-६० च्या दरम्यान तयार केलेल्या मास्टर प्लॅन मध्ये केला नाही, असे दिसते. नाहीतर जर गोलाकार रेल्वेचा प्रस्ताव सदर योजनेमध्ये घातला असतात, तर आज हा संबंध कॉरिडोर रेल्वेसाठी उपलब्ध झाला असता पुणे शहराची वाढती लोकसंख्या नगररचना योजना हद्दी बाहेर व पुणे पालिकेच्या क्षेत्रामध्ये शहराची वाढ समाविष्ट झाली असती व याही क्षेत्रासाठी महापालिकेने नगर योजना तयार केल्या असल्या व शैक्षणिक, आरोग्य, वाणिज्य, करमणूक क्षेत्र, क्रीडांगण, भाजी मंडई इत्यादी आरक्षणासाठी त्या वेळच्या बाजारभावाने नगररचना योजनेद्वारे पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या झाल्या असत्या.

त्यांच्या पूर्वनियोजित संकल्पाप्रमाणे श्री. स.गो. बर्वे हे सनदी सेवेतून सप्टेंबर १९६१ रोजी निवृत्त होणार होते व अधिक मोठया देशसेवेसाठी, राजकारणात जाणार होते. ते निवृत्तीपूर्व रजेवर ग्रंथलेखन करत होते, पण १२ जुलै १९६१ रोजी पानशेत, खडकवासला धरणे फुटली, तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना विनंती केली व त्या कठिणकाळात आपत्ती नियोजन व संकटकाळात पूरग्रस्तांना मदत व पुनर्वसन या कामावर मुख्यमंत्राचे खास प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली सर्वाधिकारासह शासनाच्या निरनिराळ्या खात्यासह उदा. महापालिका, नगर नियोजन विभाग, शासनाचे पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वीजमंडळ, टेलिफोन, टपालखाते, रेल्वे या सर्वात सुसूत्रीकरण करणे हयाची जबाबदारी सोपवती. श्री. स.गो. बर्वे यांनी आपत्ती नियोजनाची योग्य आखणी करून संघटीत कार्यपध्दतीने पुण्याचे पुनर्वसनाचे काम चांगल्या प्रकाराने त्वरेने केले. श्री. सदाशिवरावांची प्रवर्गी कार्यक्षमता पुण्याने अनुभवली.

त्यांनी १९५१-५२ साली चालू केलेली नागरी नवीकरणाची (Utilization) सुरूवात १९६१ च्या पुरानंतर मोठया प्रमाणावर सुरू झाली, महर्षिनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, लक्ष्मीनगर हया वसाहती श्री. बर्वे यांच्या पुढाकाराने स्थापन झाल्या, मोठे भूखंड ताब्यात

घेऊन नगरनियोजन विभागाकडून त्यांची नियोजनबद्ध आखणी करून नंतर नव्या वसाहती उभारण्यात आल्या.

लष्कराची मदत घेत सेनादत्त पेठ उभी केली, तसेच टिळक रोडचा ताण कमी करण्यासाठी ८०-०’ रूंद लाल बहादुर शास्त्री रोडची आखणी करण्यात आली.

पाणी पुरवठ्यासाठी मुळशी योजना केवळ ३ महिन्यात आंमलात आणली. यासाठी इर्मजन्सि हेड क्वार्टर्स (सरकारी इन्स्पेक्शन बंगलो) येथे २४ तास काम चालू असे. पुनर्वसनाच्या सर्व गोष्टी त्वरेने साकारताना श्री. बर्वे व त्यांचे काही सहकारी कार्यालयाताच रहात होते व दिवसाचे १८ तास काम करत रात्री १२ वाजता विविध कामाची मीटिंग घेत व पुढच्या कामाची आखणी करत त्यासाठी जरूरी असणाऱ्या गोष्टींची तरतूद करत.

१९६२ साली शिवाजीनगर मतदार संघातून विधानसभा निवडूणक जिंकल्यानंतर ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले. अर्थशास्त्रज्ञ असलेले श्री. स.गो. बर्वे यांनी महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्याची सुरूवात केली.